उद्घाटन समारंभ
दिनांक ५ व ६ मे २०२२ रोजी सायं. ४.०० वाजता.
कृषी प्रदर्शन व कृषी मेळावा (पालसाई येथे ग्रामीण परिसरात आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन व कृषी मेळावा)
उद्देश : शेती व्यवसायातून विज्ञानाने कृषी तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नाने वैशिष्ठपूर्ण व उपयुक्त बदल घडवून आणलेले आहेत. त्यांच्या माहितीचे ज्ञान सर्व स्तरातील शेतकरी बंधू भगिनींना व्हावे व आपल्या शेतीच्या उत्पादनात भरघोश वाढ करता यावी जेणेकरून आपला आर्थिक स्तर उंचावून सुखी व संपन्न जीवन जगता यावे हाच मुख्य उद्देश आहे.
परंतु ताशे होत न्हिकारां उत्पादन देणाऱ्या पिकांवर येणार भयानक रोग, पिकांना खाणारी किडी, कीटक तसेच बदलते हवामान , भयानक उष्णता, अति थंडी, सेंद्रिय अन्न द्रव्यांची कमतरता, सूक्ष्म अन्न द्रव्यांचा अभाव, केमिकल अन्न द्रव्यांचा अतिरिक्त वापर, त्यामुळे नापीक होणाऱ्या जमिनी ह्यामुळे उत्पादनात होणारी घाट ह्या सर्व शेतकऱ्यांनी व शेती व्यवसायात उध्वस्त करणाऱ्या गोष्टी आहेत.
आणि म्हणून आपल्या कृषी शाश्त्रज्ञांनी सातत्याच्या अथक प्रयत्नातून कमी कालावधी मध्ये भरघोस उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींची निर्मिती केलेली आहे.
मग ती वाडा कोलाम असो, वाडा झिनिया असो, सुपर वाडा कोलाम सारख्या, आर्थिक उत्पादन देणाऱ्या, चविष्ठ, न पडणाऱ्या, न लोळणाऱ्या, औषधी गुणधर्म असणाऱ्या, तांदळाच्या (भाताच्या), तृणधान्यांच्या जाती असोत, भाजीपाल्याच्या जाती असोत, तेलबियांच्या जाती असोत, कड धान्याच्या असोत, कापसाच्या असोत, ह्या मध्ये शाश्त्रज्ञानींनी आमूलाग्र करणी घडवून आणलेली आहे.
ह्या निविष्ठांच्या उत्पादनांचा पन्नास टक्के भाग जरी शेतकऱ्यांच्या पदरात पडला, त्यांना योग्य तो बाजार भाव मिळाला, तरी शेतकरी सुखी व संपन्न जीवन जगू शकेल इतकी ताकद या पिकांमध्ये आहे. व या सर्वांचे ज्ञान शेतकऱ्यांना व्हावे म्हणून शेतकरी शेती संस्था, शेतीच्या निविष्ठा निर्माण करणाऱ्या नॅशनल व मल्टी नॅशनल कंपन्या परिसरातील सर्व निविष्ठांची विक्री करणारी ऍग्रो सेंटर प्रागितिशील शेतकरी, कृषी खाते, त्यांचे अधिकारी, किरण ऍग्रो सेंटर, कृषी व्हेज सीड्स इंडिया प्रा. लि. नागेश सीड्स, मारुती सीड्स, इंडी. लि. , गरीब मागासलेले शेतकरी ह्यांना एकत्र आणावे, त्यांना माहितीचे ज्ञान द्यावे हा एक महत्वाचा उद्देश.
आणि म्हणून हा सर्व कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवून, शेती पर्यंत जावा ह्यासाठी.
लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा चौथा स्तंभ परिपूर्ण पत्रकारिता आमच्या परिसरातील ज्ञानी, अभ्यासू, खऱ्याखोट्याची जण असणारे, शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारे, अभ्यासू पत्रकार ह्याच्या विशष आग्रहास्तव हा महत्वाचा व उपयुक्त कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आमच्या विनंतीला मान देऊन शेती व्यवसायासाठी, पिकांच्या संरक्षणासाठी, उत्पादन वाढीसाठी निविष्ठा उत्पादन करणाऱ्या नॅशनल व मल्टी नॅशनल कृषी कंपन्या यांनी येण्याचे मान्य केले आहे.
त्यांचा लाभ परिसरातील शेतकार्यांना होऊ शकतो. ह्या कंपन्यांची रोग प्रतिकार शक्ती असणारी औषधे, कीटक नाशके, अधिक उत्पादन देनारी बियाणे, शेंद्रीय खाते, सुक्ष्म अन्न द्रव्ये, मातीची शक्ती वाढविणारे अन्न द्रव्य ह्या सर्वांची विक्री करणारे, शेतकऱ्यांच्या शेती पर्यंत जाणारे आमची ऍग्रो सेंटर ह्यांनी हि येण्याचे मेनी केले आहे
तसेच ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आशिर्वाद देण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी जिव्हाळा असणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, कार्यसम्राट, माननीय केंदीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे मान्य केलं आहे. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय रावसाहेब दानवे साहेब, केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय भारतीताई पवार ह्यांनी येण्याचे मान्य केले आहे. तसेच महाराष्ट्राचे लाडके, कर्तव्यदक्ष, शेती व शेतकऱ्यांच्या प्रति जिव्हाळा असणारे माननीय कृषी मंत्री दादासाहेबजी भुसे हे आवर्जून उपस्तिथ राहून मार्गदर्शन व कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
तसेच देशाचे पंचायतराज मंत्री माननीय कपिलजी पाटील हेही उपस्तिथ राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक अध्यक्ष व भारताचे अल्पसंख्यांक अध्यक्ष उपस्तिथ राहणार आहेत.
परिसरातील सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, जि. प. अध्यक्ष, प. स. सभापती, उप सभापती, सदस्य, ग्राम पं. सरपंच, उप सरपंच, परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्तिथ राहून कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत.